पैठण न. प. उपनगराध्यक्षपदी तुषार पाटील बिनविरोध, नगराध्यक्षा विद्या कावसनकर यांनी पदभार स्वीकारला

Foto
पैठण, (प्रतिनिधी) नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी तुषार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसनकर यांनी पदभार स्वीकारला आहे.

नगरपरिषदेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेला भव्य पदग्रहण सोहळ्यास आमदार विलास भुमरे, राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, प्रसिद्ध उद्योजक, राजेंद्र तांबे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, नाथ संस्थांनचे कार्यकारी विश्वस्थ दादा बारे, विजय गोरे, माजी नगराध्यक्ष जीतसिंग करकोटक, सोमनाथ परदेशी, राजू गायकवाड, आप्पासाहेब निर्मळ, भाऊसाहेब तरमळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितू परदेशी, महिला आघाडीच्या ज्योती काकडे, पुष्पा गव्हाणे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सुनील शेठ बलदवा, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, सुभाष मुळे, अक्षय जायभाय, किशोर चौधरी, विजय पापडीवाल, शेखर शिंदे, सुनील हिंगे, संजय पापडीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार विलास भुमरे म्हणाले की, पैठणच्या जनतेने खासदार संदिपान भुमरे व माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे नगरसेवक असो सर्वांना सोबत घेऊन शहराची प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येईल. कोणताही भेदभाव करणार नाही असे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेने निवडून दिलेले नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या कावसनकर यांनी सांगितले की शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष दिले जाईल.
प्रत्येक प्रभागात स्वच्छता राबविण्यात येईल मोहीम तसेच विजेचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यातील असे त्यांनी सांगितले. खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शना खाली सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन व नागरिकांना विश्वासात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक ईश्वर दगडे, बजरंग लिंबोरे, अलका परदेशी, सुनील रासने, गोवर्धन टाक, वैशाली परदेशी, मंगल सुनील हिंगे, योगिता गणेश बरकड, वीर जीत करकोटक, महेश बाळासाहेब मुंदडा, संगीता मापारी, गौरव आठवले, मनीषा स्वप्निल साळवे, कविता शिंदे, हस्नोद्दीन कट्यारे, दिपाली सोनारे, अनिता वीर, पूजा पारिक, असीफा बेगम, स्नेहल धूपे, राजश्री गायकवाड, विलास अडसूळ, रफिक कादरी, ज्ञानेश्वर दहिवाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची यांची उपस्थिती होती..